सातगाव (डोंगरी) आश्रमशाळेत आदिवासींना खावटी किटचे वाटप

पाचोरा, प्रतिनिधी  । कोरोना काळात अनेकांचा रोजगार बुडाल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना राज्य शासनाने रोख रक्कम व जीवनावश्यक वस्तू निर्णय जाहीर केला होता. यानुसार  सातगाव (डोंगरी) आश्रमशाळेत आदिवासींना खावटी किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. 

 

कोरोना काळात अनेकांचा रोजगार बुडाल्याने आदिवासी समुदायाच्या उपजिविका लक्षात घेऊन राज्य शासनाने दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपयाच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट पात्र आदिवासी कुटुंबांना देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याप्रमाणे डी. बी. टी. द्वारे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये देऊन व दोन हजार रुपयांची जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्याचा शुभारंभ  सातगाव (डोंगरी) आश्रमशाळेत करण्यात आला. या  योजनेंतर्गत सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा आश्रमशाळेत माजी सभापती सिकंदर तडवी, माजी उपसभापती अनिता पवार, उपसरपंच रज्‍जाक तडवी, जयसचे अध्यक्ष अमित तडवी, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजीत तडवी, आदींच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. आदिवासी लाभार्थी कुटुंबांच्या माध्यमातून जीवनावश्यक अन्नधान्यांचे किट देण्यात आल्याने सर्वांनी शासनाचे आभार मानले. तसेच कोरोना काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता तालुक्यात गावोगावी फिरून आदिवासींच्या घरी जाऊन सर्व्हे  केल्याने या कोरोना योद्धयांचा गौरव ही यावेळी करण्यात आला.  प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या शकिला तडवी, आकाश डांबरे, सागर चौधरी, सत्तार तडवी, डी. आर. वाघ, सिराज तडवी, मस्तान तडवी, जुम्‍मा तडवी, अब्बास तडवी, अशोक तडवी, माजी सरपंच सयदाबाई तडवी तसेच पात्र लाभार्थी व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. आर. पाटील तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी मानले.

 

Protected Content