साखळी उपोषण ३२ वा दिवस ; आंबेडकरवादी जन संघटनांचा सहभाग

WhatsApp Image 2020 01 27 at 6.13.41 PM

जळगाव, प्रतिनिधी | २३ डिसेंबरपासून जळगाव मुस्लिम मंच यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयाबाहेर भारतीय नागरिकत्व कायदा, एनआरसी व एनआरपीला विरोध करण्यासाठी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आज सोमवार ३२ वा दिवसहोता. आज या उपोषणाला जळगाव येथील विविध रिपब्लिकन पक्षातील घटकांनी एकत्रित येऊन आंबेडकरवादी जनसंघटना जळगावद्वारे मुस्लिम मंच धरणे आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

आंबेडकरवादी जनसंघटना व मुस्लिम मंच सभासदत्व यांनी एकत्रित येऊन यावेळी उपोषणकर्त्यांनी तोंडावर हात ठेऊन बुरा ना बोलो, डोळ्यांवर हात ठेवत बुरा ना देखो व कानावर हात ठेवत बुरा ना सुनो असे म्हणत भारत सरकारच्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध नोंदविला. आंबेडकरवादी जनसंघटनेचे मुकुंद सपकाळे, चंदन बिराडे, प्रा. प्रीती लाल पवार, प्रा. चंद्रमणी लभाने, हरिश्चंद्र सोनवणे, संजय सपकाळे, संजय तांबे, भारत ससाने, दिलीप सपकाळे, ग्रूणात सैंदाणे, भीका सोनवणे, सुरेश तायडे , माजी नगरसेवक राजू मोरे, जे. डी. भालेराव, यशवंत घोडेस्वार, आनंदा तायडे, बाबुराव वाघ, गौतम सपकाळे, भारत सोनवणे, नाना मगरे, संदीप सपकाळे, गौतम सपकाळे, पिंटू सपकाळे, प्रा. मोरे, प्रभाकर सुरवाडे, किरण वाघ यांनी मार्गदर्शन व जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी विकास लाडवंजारी यांना निवेदन सादर केले. २५ जानेवारी शाह कुटुंबीयांचे धरणे आंदोलनाचे निवेदन सुद्धा देण्यात आले. सदरचे निवेदन रऊफ खान, शेख खलील टेलर, युनुस कासम, सहिद जनाब, शरीफ शाह बापू, वसीम शाह बापू, शेख वाजिद व अल्ताफ शेख यांनी सादर केले.  औरंगाबाद येथील कार्यशाळेतून अब्दुल करीम सालार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती संकलित केली व ती उपोषण आर्थी समोर सादर केली . गफार मलिक, फारुक शेख, अल्ताफ शेख ,यांच्यासह प्रीती लाल पवार, गुरुनाथ सैंदाणे हरिश्चंद्र सोनवणे, लवंगारे सर, जे.डी. भालेराव ,एॅड. आयुब सिकलिगर ,संजय तांबे ,मुकुंद सपकाळे ,भारत ससाने, मोहम्मद रेहान ,सचिन धांडे ,शरीफ शाह यांनी सुंदर असे संभाषण केले. आजच्या उपोषणस्थळी आंबेडकरवादी जन संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. ३२ व्या दिवशी प्रथमता एका इतर समाजातील तरुणाईने उघडपणे या मंचाद्वारे भारतीय नागरिकत्व कायद्याला आपला विरोध नोंदविला व पूर्णपणे उपोषणात सहभागी झाले त्याबद्दल मुस्लिम मंचचे समन्वयक फारुक शेख, डॉ. अमानुल्ला शाह, प्रा. डॉ. एकबाल शहा व ताहेर शेख यांनी त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Protected Content