मुंबई वृत्तसंस्था । लॉकडाऊनमुळे देशात बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता साख्रर उद्योगासाठी भरीव आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
‘लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या संकटात होता. त्यावर केंद्र सरकारनं किमान हमीभाव, साखर निर्यात, बफर स्टॉक, भांडवली खर्चावरील व्याजापोटी दिल्या जाणाऱ्या अनुदानाबरोबरच अन्य आर्थिक उपाययोजना योजल्या होत्या. मात्र, करोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यावर तातडीनं काही उपाययोजना करण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने अलीकडेच पवारांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात साखर उद्योगाला वाचवण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले होते. पवारांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात या उपयांचा उल्लेख केला आहे.