मीरारोड (वृत्तसंस्था) साखरपुड्यानंतर होणाऱ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेऊन नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २२ वर्षीय तरुणीचे गोरेगावच्या २६ वर्षीय तरुणाशी लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून लग्न जुळले होते. २० फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा झाला, पण नंतर लॉकडाऊन लागू झाल्याने लग्न करता आले नाही. परंतु साखरपुडा झाला असल्याने दोघं एकमेकांना भेटत होते. लॉकडाऊन काळात तरुण आपल्या भावी पत्नीच्या घरीच महिनाभर येऊन राहिला. त्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध सुद्धा झाले. परंतु नंतर मात्र त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणी गोरेगाव येथे तरुणाच्या घरी त्याच्या आई वडिलांना जाब विचारण्यास गेली असता तिला तेथे मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर तरुणासह त्याचे आई, वडील व भावास देखील आरोपी करण्यात आले आहे.