यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे श्रीराम मंदीराच्या निधी संकलनासाठी आयोजित केलेल्या जनजागृती अभियानास सुरूवात करण्यात आली आहे. या अभियानाला गावातील सर्वच भागात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
श्रीराममंदीर निर्माण निधी समर्पण अभियाना अंतर्गत साकळी येथे ११ रोजी श्री भवानी माता मंदीर मंगल कार्यालयात ‘संत-महंत आशिर्वचन- मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन या अभियानाचा संत- महंतांच्या व रामभक्तांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आलेला होता. हे अभियान साकळी मंडळातील एकूण तेरा गावात टप्प्याटप्प्याने राबवले जाणार असून सुरुवात साकळी गावापासून करण्यात आलेली आहे. गावातील एकूण सहा वार्डातील वाड्या-वस्तीतील घरोघर जाऊन निधी संकलन केले जात आहे. गावातीलआर्थिक दुर्बल घटकापासून ते श्रीमंत घटकातील व्यक्तींपर्यंत पोहचून निधी संकलित केला जात आहे. सर्वच समाजघटकातील श्रीराम भक्तांकडून तसेच विविध संस्था, पदाधिकारी यांचेकडून निधी संकलन अभियानास उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.
सदर अभियानात विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी, तालुका स्वागत समितीचे सदस्य सुभाष नाना महाजन, पांडुरंग निळे, सूर्यभान बडगुजर सुनील नेवे यांचेसह निधी संकलन समितीचे मंडळ प्रमुख योगेश खेवलकर, कोषाध्यक्ष राजेंद्र नेवे, वसंत बडगुजर, अशोक बडगुजर, अंबादास वाणी, रामकृष्ण खेवलकर, शामकांत महाजन, पंढरीनाथ पाटील, बापू सांळूंके, साहेबराव बडगुजर,जगदिश मराठे, नितीन फन्नाटे, जगदीश चौधरी, भिका महाजन, नूतन बडगुजर, मोहन बडगुजर, मयूर चौधरी, दिनेश माळी, बापू पाटील, नितिन महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व श्रीराम भक्त या निधी संकलन अभियानात सक्रिय सहभाग देत आहे.एकूणच या अभियानामुळे गावातील संपूर्ण वातावरण राममय बनलेले आहे.अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराचे निर्माण होऊन हे मंदिर संपूर्ण भारतभूमीचे राष्ट्रमंदिर व्हावे अशी अपेक्षा मंडळातील श्रीराम भक्तांकडून व्यक्त केली जात आहे.