साकळी ते गावफाटा रस्ता धोकादायक

 

 यावल : प्रतिनिधी  । तालुक्यातील साकळी गावातील बस स्थानकाच्या फाटयापासुन   गावात जाणाऱ्या मार्गावरील रस्ता  चुकीच्या व अर्धवट कामामुळे धोकादायक बनला आहे

 

हा रस्ता  पावसाच्या पाण्याने  जलमय होत असून, पादचाऱ्यांना व वाहनधारकांना त्रास सोसावा लागत आहे  तात्काळ या मार्गावरील काम पुर्ण करून पाण्याची  विल्हेवाट  लावावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांचेकडे सामाजीक कार्यकर्ते मिलींद जंजाळे यांनी केली काम  न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

 

या संदर्भात मिलींद जंजाळे यांनी साकळी सरपंच, ग्रामविकास अधिकारी , सार्वजानिक बांधकाम विभाग , गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , साकळी गावापासुन बसस्थानकाकडे जाणाऱ्या फाटयापर्यंत रस्ता महत्वाचा असुन, बाहेरगावातील नागरीकांच्या येण्याजाण्यासाठीचा हा एकमेव रस्ता आहे . रस्ता काँक्रीटीकरणाचा करण्यात आला असतांना रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे .

 

रस्ताच्या बाजुस अर्धवट बांधलेल्या गटारीमुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ठीकठीकाणी अडीच ते तिन फुटापर्यंत पाणी साचले जात असुन , तुंबलेल्या पाण्यामुळे रस्ता व त्यातील पडलेले खड्डे आणी गटारीत तुंबलेले पाणी या सर्व गोंधळामुळे पादचाऱ्यांपासून तर वाहन धारकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे

 

ही गंभीर समस्या न सोडविल्यास निष्क्रीय प्रशासनाच्या विरोधात ३० जुनपासुन सहकार्यांसोबत आंदोलन करणार असल्याचा ईशारा निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे मिलींद जंजाळे यांनी दिला आहे .

 

Protected Content