साकळीत शौचालयाच्या कामात भ्रष्ठाचार झाल्याचा आरोप

1swachhatbharatabhiyan 2

 

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत अंतर्गत मागील वर्षी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी भारत स्वच्छता अभियानांतर्गत गावपातळीवर विविध प्रभागामध्ये शौचालय बांधण्यात आली आहेत. यात काही शौचालया लाभ न घेणाऱ्या नागरीकांच्या नावांवर देखील अनुदान टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे.

 

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत ‘घर तिथं शौचालय’ ही योजना राबविण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातुन प्रत्येक नागरीकाला व्यक्तिगत शौचालय बांधण्याकरीता शासनाच्या वतीने १२ हजार ५०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येते. साकळी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सन २०१९च्या नोव्हेंबर,डिसेंबर या महीन्याच्या कालावधीत शौचालयाच्या लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने अनुदान म्हणुन प्रत्येकी १२ हजार ५०० रुपये प्रमाणे अनुदान वाटण्यात आलेत. यात साकळी येथील चार ग्रामस्थांना लाभार्थी दाखवून त्यांच्या नांवावर व्यक्तीगत शौचालयच्या अनुदानपोटी अनुदान परस्पर दुसऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात येवुन ती रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यातुन ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांनी संगनमताने मिळुन काढल्याचा आरोप आहे. एका जागृत सामाजीक कार्यकर्त्याच्या निर्दशनात ही आर्थिक गोंधळाची बाब आली असून पंचायत समिती पातळीवर या प्रकाराची चौकशी झाल्यावर सत्य काय ते उघडकीस आणावे, अशी मागणी होत आहे.

Protected Content