शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगीपुरा या गावी सोमवार ६ जुलै रोजी आर्सेनिक अल्बम ३० या रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या व मास्कचे वाटप करण्यात आले.
शेंदूर्णी येथील साई केबल नेटवर्क परिवारातील रमेश राजपूत, रेखा राजपूत, मेहुल राजपूत यांच्यातर्फे होमिओपॅथी गोळ्या व मास्कचे घरोघरी जाऊन फिजीकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून वाटप करण्यात आले. गावातील सर्व ४०० घरातील नागरिकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच कविता इच्छाराम राजपूत, उपसरपंच रेखा लक्ष्मण राजपूत, ग्रामपंचायत सदस्य मनोज भास्कर पाटील, अरुण सुभाष मोरे, कल्पना राजेंद्र राजपूत, सुनील मच्छीन्द्र राजपूत, सुनंदा शांताराम पाटील ग्रामसेवक शरद घोंगडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी इच्छाराम राजपूत, लक्ष्मण राजपूत,राजेंद्र राजपूत, पदम राजपूत, नाना पाटील, सुभाष पाटील, राहुल पाटील यांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना साई केबल संचालक रमेश राजपूत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढला असून अनेक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून येत आहे. कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. परंतु, आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकार शक्तीची वाढ होत असल्याचे होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितले आहे म्हणून जंगीपुरा येथील नागरिकांना या गोळ्यांचे व मास्कचे वाटप करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी जागरूक राहून फिजीकल डिस्टन्स व मास्कचा नियमितपणे वापर करणे गरजेचे आहे. कामाशिवाय घराबाहेर न पडणे हा उपाय सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतो म्हणून गोळ्या, मास्क बरोबरच स्वतः काळजी घेऊन परिवाराला कोरोना संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.