सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी आराखड्यास मान्यता

mantralay building

मुंबई प्रतिनिधी । राज्याच्या नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील ३९१ स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ९७५८.५३ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी निर्माण झालेली क्षमता ७७४७.२४ एमएलडी इतकी असून नव्याने निर्माण करावयाची प्रक्रीया क्षमता २०११.९१ इतकी आहे. सांडपाणी प्रक्रीया क्षमतेचे प्रमाण हे जवळपास ७९ टक्के इतके समाधानकारक आहे. असे असले तरी राष्ट्रीय हरीत लवादाने दिलेल्या निदेशानुसार सांडपाण्यासाठी आवश्यक असलेली ही २०११ एमएलडी मलप्रक्रिया क्षमता उभारणे बंधनकारक आहे.

यानुसार राज्यातील महानगपालिका व नगरपरिषद क्षेत्रामध्ये टप्पा-१ मध्ये कमतरता असलेली मलप्रक्रिया क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक रूपये २८२० कोटी इतका निधी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान-दोन किंवा राज्य शासन पुरस्कृत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून उभारण्यात येणार आहे. नगरपंचायत क्षेत्रामध्ये विकेंद्रीत सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक निधी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. या आराखडयातील टप्पा-२ मध्ये सांडपाणी एकत्रिकरणाचे लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

Protected Content