यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी खुर्द या गावातील ६३ वर्षे वयाच्या व्यक्तीचा पावसाच्या पाण्यात आलेल्या नाल्याच्या पुरा मध्ये वाहून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सांगवी ते राजुरा गावा दरम्यानच्या नाल्यात घडली आहे.
या संदर्भात माहिती पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे राहणारे रतन दंगल सोनवणे (वय ६३ वर्ष) हे दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतात जाऊन पाण्याचा व्हॉल पाहून येतो असे सांगून घरून गेले असता ते रात्री रात्री घरी आले नाही. त्यामुळे घरच्या मंडळींनी शेतात जाऊन रतन सोनवणे यांचा शोध घेतला असता असता ते मिळून आले नाही. त्यांनी शेत मालक सुधाकर कोळी यांना देखील विचारणा केली असतात त्यांना या संदर्भात माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर यांच्या कुटुंबीयांनी व शेत मालकांनी शेताच्या बाजूला असलेल्या राजोरा शिवारातील मानपाडा नाल्याच्या क्षेत्रात शोध घेतला असता सोनवणे हे नाल्याच्या चिखलात मृतावस्थेत आढळून आले.
शेतात कामाला गेले असता रात्री आलेल्या पावसात नाल्याला पूर आल्याने त्यांचा तोल जाऊन ते नाल्याच्या पाण्यात वाहून जाऊन मरण पावल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. दरम्यान, यावल पोलीस स्टेशनला मयताचा मुलगा पंकज रतन सोनवणे वय २९ वर्ष याने खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहेत. मयताच्या यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.