सांगलीतील पराभवामुळे भाजपकडून पुण्यात खबरदारी

 

 

पुणे : वृत्तसंस्था । महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी भाजप नगसेवकांना व्हिप जारी करण्यात आला आहे. सांगली महापालिकेत बसलेल्या झटक्यानंतर भाजपने हा निर्णय घेतलाय.

 

भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांवरुन भाजपने स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीपूर्वी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे

 

 

पुणे महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूक शुक्रवारी पार पडणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून हेमंत रासने यांनी, तर शिक्षण समिती अध्यक्षपतासाठी मंजुश्री खर्डेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्षपदासाठी कालिंदा पुंडे यांनी अर्ज दाखल केलाय.

 

 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे.  शिक्षण समिती उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे.

 

 

 

सांगली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रमक केलाय. सांगलीत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.  भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.

Protected Content