चाळीसगाव (दिलीप घोरपडे) । सह्याद्री पर्वताच्या कुशीत भटकंती करणाऱ्या प्रत्येक सह्याद्रीप्रेमी, गडप्रेमी, दुर्गप्रेमींना, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई येथे आयुष्यात एकदा तरी जावे याचे नेहमीच आकर्षण असते. याच आकर्षणातून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या शिलेदारांनी २४ फेब्रुवारी रोजी कळसुबाई शिखराची चढाई करून या शिखरावरील सर्वोच्च स्थानावरून आजूबाजूला दिसणारा निसर्गरम्य परिसर डोळ्यात सामावून घेतला.
कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून १६४६ मिटर (५४०० फुट ) उंचीवर असून पायथ्यापासून शिखरापर्यंत अत्यंत अवघड अशी दमछाक करणारी चढाई गिरिभ्रमण करणाऱ्या पर्यटकांना नेहमीच आव्हानात्मक असते. मात्र सह्याद्रीचे सौंदर्य इतके विलोभनीय आहे की, हे आव्हान गिरी भ्रमंती करणारे हौशी पर्यटक लिलया पार करतात. चढाई मार्गावर असलेल्या लोखंडी सिड्या थरथरत्या पायांनी चढताना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो. टप्प्याटप्प्यात असलेली ही शिखर चढाई एकूण ७ टप्प्यांमध्ये विभागल्यासारखी वाटते. शेवटच्या टप्प्यात एक छोटीशी पाण्याची विहीर या संपूर्ण चढाईत पिण्याचे पाण्याचे साधन म्हणून आहे. एवढी चढाई करून आल्यानंतर या विहिरीतले थंडगार पाणी संपूर्ण थकवा दूर करण्यास मदत करते. याठिकाणी हातापायावर व चेहऱ्यावर थंड पाण्याचे सबके मारुन काहीसा थकवा दूर करून अंतिम टप्प्याची चढाई सुरू होते. या अंतिम टप्प्यातील उभी चढण चढून गेल्यानंतर शेवटी एका मोठ्या लोखंडी शिडीने भव्य अशा प्रचंड मोठ्या खडकाच्या चौथर्या वरील सर्वोच्च शिखरावर प्रवेश होतो आणि याच शिखरावर कळसुबाई मातेचं मंदिर आहे. या शिखरावरून सभोवताल हरिश्चंद्रगड, कोकणकडा, सांदण व्हॅली, हे सह्याद्रीचे मोहक सौंदर्य दिसते तर खाली प्रचंड जलसाठा असलेले भंडारदरा, भातसा, व इतर काही धरणे दिसतात. थंडगार वारा या शिखरावर दमून थकून चढाई करून आलेल्या पर्यटकांचा संपूर्ण दाखवा काही क्षणातच दूर करतो आणि कळसुबाई मातेचे दर्शन करून महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केल्याचा अनुभव.
यावेळी आम्हाला याला व आम्ही आनंदात गोंधळगितावर मनसोक्त नाचलो. पायथ्यापासून ते शिखरापर्यंत चढाई मार्गावर ठिक ठिकाणी शीतपेय चहा बिस्किटे नाष्टा याची दुकाने असल्याने कुठल्याही प्रकारची गैरसोय पर्यटकांची होत नसल्याने आणि सर्वोच्च शिखरावर जाण्याचा एक स्वर्गीय आनंद घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातून अनेक पर्यटक या ठिकाणी नेहमी येत असतात.
या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानचे शिलेदार दिलीप घोरपडे, गजानन मोरे, योगेश शेळके, संभाजी पाटील, दीपक राजपूत, सचिन पाटील, विनोद शिंपी, वाल्मीक पाटील, जितेंद्र वाघ, संजय पवार, पप्पू पाटील, संदीप वराडे, ललित बारी, मनोज भोळे, प्राजक्ता घोरपडे, सचिन घोरपडे, अजय घोरपडे, शितल पवार, प्रिया शिंपी, समीर शिंपी, साहिल शिंपी, आदींनी सहभाग घेतला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/204503500920204/