सहकाऱ्याच्या बळावरच करु शकलो प्रगती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कार्यालयीन कामकाज करतांना सहका-यांचे बळ अतिशय महत्वाचे आहे. त्याच  बळावर विद्यापीठासोबतच वैयक्तिक प्रगती करु शकलो, अशी भावना  ज्ञानस्त्रोत केंद्र तथा कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ.अनिल चिकाटे यांनी सेवानिवृत्ती पूर्व समारंभ कार्यक्रमात व्यक्त केली.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि कला व मानव्यविद्या प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक प्रा. डॉ.अनिल चिकाटे यांच्या सेवानिवृत्ती पूर्व आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर, संगीत विभागाच्या प्रा. अलका चव्हाण उपस्थित होते. ज्ञानस्त्रोत केंद्र तथा कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ.अनिल चिकाटे हे दि. 31 मार्च 2023 रोजी निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने बुधवार 29 रोजी डॉ. चिकाटे यांचा हृदय गौरव करण्यात आला.

 

गौरव समारंभात उत्तर देतांना डॉ. चिकाटे भावूक झाले. यावेळी त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेतील जुन्या आठवणींना उजाळा देत अनुभव कथन केले. तसेच संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर, प्रा. अलका चव्हाण, डॉ. तुषार रायसिंग, डॉ. सुभान जाधव, डॉ. सोमनाथ वडनेरे, राजेंद्र महाले यांनी मनोगते व्यक्त केलेत. सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन यांनी केले. आभार डॉ. गोपी सोरडे यांनी मानले. यावेळी डॉ. अनिल तौर, डॉ. रोहित कसबे, प्रा.तेजस मराठे, प्रा. प्रिया महाले, सौ.रंजना चौधरी, प्रल्हाद लोहार, पंकज शिंपी, सिध्दार्थ बत्तीसे, कुंदन ठाकरे, राजेंद्र महाले, राजू पाटील, मंगेश बाविसाणे, आदी उपस्थित होते.

Protected Content