मुक्ताईनगर परिसरात वकीलाच्या घरात दरोड्याचा प्रयत्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एसएमआयटी कॉलेजजवळील मुक्ताईनगर परिसरात राहणाऱ्या वकिलाच्या घरी दुपारी काही संशयित आरोपींनी दरोडाच्या उद्देशाने येऊन वकिलाच्या १० वर्षाच्या मुलीवर दरवाजा उघडण्यासाठी दबाव टाकला. मात्र संशयित आरोपींना अजिबात न भिता या दहा वर्षाच्या मुलीने दरवाजा न उघडून आरोपींना हिमतीने परतवून लावले. याबाबत बुधवारी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन देविदास पाटील (वय-४३) यांनी याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. बुधवारी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांची १० वर्षांची मुलगी शृंगी ही घरात एकटी होती. तेव्हा काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरासमोर आले. त्यातील एकाने वकिलांच्या दारासमोर जात दरवाजा वाजविला. तेव्हा सेफ्टी डोअर लावलेला असल्याने लहानग्या शृंगीने साधा दरवाजा उघडला. संशयित दरोडेखोर म्हणाला, मला पाणी पाज, नाहीतर मी दरवाजा तोडून आत घुसेल. मात्र शृंगीने हिम्मत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही. अखेरपर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे दरोडेखोर तिथून निघून गेले. संध्याकाळी जेव्हा वकील सचिन पाटील घरात आले, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीने घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार नोंदवली. वकिलांच्या घरात संभाव्य दरोडा पडताना वाचला असला तरी गुन्हेगारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा पोलीस दलामुळे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Protected Content