सहकार महर्षी उदेसिंगअण्णा पवार अनंतात विलीन

चाळीसगाव प्रतिनिधी । सहकार महर्षी उदेसिंग अण्णा पवार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर वरखेडे येथे हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सहकारमहर्षी अण्णासाहेब उदेसिंग रामसिंग पवार (वय ९३) यांचे आज पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी वरखेडे बुद्रूक येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते ३० वर्षे सभापती होते. सर्वोदय शिक्षण संस्थेचे ते संस्थापक होते. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, बेलगंगा सहकारी साखर कारखाना, सर्वोदय शिक्षण संस्था, शेतकरी सहकारी संघ, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ, जिल्हा लोकल बोर्ड अशा अनेक संस्थांमधील उदेसिंगअण्णा पवार यांनी आपल्या कर्तबगारीची मोहर उमटवली होती.

Protected Content