यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासन निर्णयात कांदा अनुदानासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्तीमद्ये कांदा अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर लेट खरीपाची नोंद आवश्यक आहे, परंतु जळगांव जिल्ह्यात ई-पीक पाहणी ॲपमध्ये लेट खरीप पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळू शकला नाह, अश्या अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने कांदा अनुदानासाठी प्रति क्विंटल ३५० रुपये आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी असे अनुदान द्यावे या संदर्भातील निवेदन अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले आहे.
या बाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या विषयी पत्र देऊन अवगत केले होते, त्यानुसार महाराष्ट्र शासन निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात निर्गमित केले होते. त्यानुसार ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर ई-पीकपेऱ्यांची नोंद झालेली नाही, अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी गावपातळीवर संबंधित गावाचे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या मार्फत समिती गठीत करुन पात्र शेतकऱ्यांना अहवाल सादर व लाभ देण्या संदर्भात आले आहे. सर्व पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येत असलेले अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी या संदर्भातील सूचना तहसील आणि तलाठी यांना देण्यात याव्यात या संदर्भातील मागणी अमोल जावळे यांनी निवेदना द्वारे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली आहे.