समता सैनिक दलाचे एकदिवशीय विशेष शिबीर

भुसावळ- तालुक्यातील निंभोरा येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर याच्या स्मृती दिना निमित्त समता सैनिक दलाचे एकदिवशीय विशेष शिबीर आयोजित करण्यात आले.

 

 

सदर शिबीर भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे ग्राम शाखा निंभोरा ब्रु || याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. शिबिराचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभा चे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांनी केले. शिबिरास प्रशिक्षण लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे व मेजर संजय साळवे यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार, जिल्हा हिशोब तपासणीसई ए. टी. सुरळकर, कार्यलयीन सचिव प्रा. आनंद ढिवरे, संस्कार सचिव रवींद्र वानखेडे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे व वैशाली सरदार,माजी सैनिक अशोक वानखेडे, बौद्धचार्य विश्वनाथ मोरे, योगेश लोखंडे, चंद्रकांत वाघ, विजय तायडे, इत्यादी उपस्तित होते. तर शिबीर यशस्वीते साठी अजय वाघ, तरुण गवई, प्रणव मैश्राम, निखिल मैश्राम, विशाल मैश्राम, राहुल तायडे, रंजना तांबे, शोभा सोनवणे, प्रज्ञा मैश्राम, जया प्रधान, लीलाबाई चतूर, प्रतिभाआव्हाड इत्यादी नी परिश्रम घेतले

Protected Content