सर्वांसाठी घरे या महा आवास अभियानची तालुकास्तरीय कार्यशाळा

 

रावेर प्रतिनिधी ।सर्वांसाठी घरे या महा आवास अभियान ग्रामीण तालुकास्तरीय कार्यशाळेच आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते उदघाटन झाले. पुढचे शंभर दिवस घरकुल संदर्भात तालुक्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

रावेर पंचायत समितीमध्ये आज घरकुल संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या घरकुल संदर्भात महत्वपूर्ण कार्य शाळेला आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील व्हिडीओ कॉन्फरंस द्वारे सहभागी झाल्या होत्या तसेच पंचायत समिती सभापती जितू पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल, विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे, हरलाल कोळी आदी उपस्थित होते. तालुक्यातील इतर पंचायत समिती सदस्य सरपंच, ग्रामसेवक व्हिडिओ कॉन्फरंस द्वारे उपस्थित होते.

२०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दीष्ट: बिडिओ कोतवाल

कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना करतांना गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल म्हणाल्या की, ग्रामीण भागात घरकुल संदर्भात सर्व योजनांवर काम करण्यात येणार आहे. यामध्ये घरकुलांची गुणवत्ता वाढवणे प्रलंबित घरकुले पूर्ण करणे तसेच तालुक्यात १ हजार ९२१ लाभार्थी असे आहे की त्यांना जागा नाही त्या लाभार्थीना जागा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी सहकार्य करण्याचे अवाहन देखील केले यासह घरकुलच्या विषयावर बिडिओ सौ कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.

घरकुलच्या जागासाठी पाठपुरावा करणार : आ. चौधरी

रावेर तालुक्यात घरकुल बांधकामसाठी ज्या लाभार्थ्याकडे जागा उपलब्ध नाही त्यांना जागा मिळवुन देण्यासाठी शासनाकडे पाठवपुरा करणार, तालुक्यात गावठान जागा नसल्याने पंचायत समिती प्रशासला जागा देण्यासाठी खुप अडचण निर्माण होत आहे.यासाठी लवकरच एक महसूल आणि पंचायत समितीची बैठक घेऊन घरकुल लाभार्थी यांना जागा देण्यासाठी पाठवपुरा करणार असल्याचे कार्यशाळेत आमदार शिरीष चौधरी यांनी स्पष्ट केले.

Protected Content