पाचोरा प्रतिनिधी । शहरातील कृष्णापुरी भागात राहणारे ५८ वर्षीय प्रौढ यांचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील कृष्णापूरी येथील रहिवाशी वाल्मिक महाजन (वय – ५८) यांचे २ ऑक्टोर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने दुःखद निधन झाले. ते नेहमी प्रमाणे सायंकाळी शेतात जाऊन गुरांना चारापाणी करुन व दुध काढून घरी येत असतांना त्यांना एका विषारी सर्पाचे दंश केल्याने त्यांचे दु:खद निधन झाले. वाल्मिक महाजन यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय आधिकारी डॉ. आमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावाई नातवडे असा परिवार आहे. वाल्मिक महाजन हे भारतीय सैन्य दलातील स्वप्निल महाजन यांचे वडील होते.