सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वडोदे प्र सावदा सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बुधवारी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले.
योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे भौगोलिक दृष्ट्या 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग् दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व मुलांनी योगासने केलीत. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे, उपशिक्षक विजय भालेराव, शुभम मेढे, दिपाली लहासे, रंजना बोदडे, संजना बैसाणे, कविता बैसाणे आणि प्रदीप तायडे या सर्वांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला.
यावेळी बोलताना सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका शमीभा पाटील म्हणाल्या की, ”योगसनांमुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. योगासने करण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करणे गरजेचे आहे”.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते. आज जगभर जागतिक योग दिवस साजरा होत आहे. सम्राट फाउंडेशन संचलित, सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल वडोदे प्र सावदा मध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर, शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे मॅडम, संचालक एडवोकेट योगेश तायडे, संचालिका शमीभा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय भालेराव सर यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना विविध आसनांबाबत मार्गदर्शन केले.
यामध्ये सहभागींनी उभ्या, बठय़ा आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार केले. मानव जातीच्या कल्याणासाठी ॠषीमुनींनी प्राणायमांचा आविष्कार केला. ताण तणांवाचे प्राणायमाच्या माध्यमातून व्यवस्थापण करता येते. ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य, उद्देश जाणून घेता येतो, अशी शिकवण यावेळी देण्यात आली.