सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सावदा येथील सम्राट फाउंडेशन शिक्षण संस्थेच्या सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेत विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजता शाळेच्या प्रांगणात “स्टार ऑफ दि मंथ” विद्यार्थी गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिवाळी सुट्ट्यानंतर विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाच्या औचित्यावर वाचन, लिखाण पंधरवडा शाळेत आयोजित करण्यात आला होता. त्याच पद्धतीने गेल्या महिन्याभरात विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींवर लक्ष ठेवून प्रत्येक वर्गातून STAR OF THE MONTH म्हणजेच त्या वर्गातील त्या महिन्याभरातील विद्यार्थ्यांचे अवलोकन करून एक विद्यार्थी निवडला जाणार आणि त्यालाच STAR OF THE MONTH या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या पुरस्काराचे महत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी. वाचन लिखाण याची सवय लागावी त्याच पद्धतीने दररोजच्या वागणुकीमध्ये बदल व्हावा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
यामध्ये इयत्ता पहिली मध्ये नितिकेश तायडे, आमोदा [प्रथम ], दुसरी मध्ये प्रज्ञा भालेराव, बामनोद [ प्रथम ], इयत्ता तिसरी मध्ये साहिल साळवे, गाते [प्रथम], इयत्ता चौथी मध्ये सिद्धेश हिवरे,गाते [ प्रथम], इयत्ता पाचवी मध्ये अजिंक्य तायडे,कोचुर खु [प्रथम], इयत्ता सहावी मध्ये कुणाल तायडे, बामनोद [प्रथम], तर इयत्ता सातवीच्या वर्गातून माया मोरे, गाते [प्रथम ], यांना सन्मानचिन्ह देऊन सम्राट फाउंडेशन शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. योगेश तायडे व सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या चेअरमन अश्विनी तायडे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना सम्राट फाउंडेशन शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणाले की, आजचा विद्यार्थी हा उद्याचं देशाचं भविष्य आहे मागील कोरोना काळात विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड वातः झालेली आहे.
विद्यार्थी यांची ही वाताहत झालेली पाहत बसणे योग्य नाही. काळ कसाही आला तरी जगायचे, शिक्षण घेणे थांबवून चालत नाही. शिक्षणाची जबाबदारी केवळ शिक्षकाची नाही, पालक आणि विद्यार्थ्यांची देखील आहे. गरिबीत जन्म झाला तरी गरिबीत राहणे हे चुकीचे आहे. त्यासाठी आभासी दुनियेत न रमता आपण आत्मविश्वासाने वाटचाल करावी. काम करणे आणि शिकणे ही आपली फ्रेम आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणसाने मोठमोठे पराक्रम केले.
इंग्रजीची भीती आपण बाळगता कामा नये. मुली आज मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. त्या तुलनेने मुले कमी आहेत. घरात पालकांनी आपली मुले व मुली यांचेशी नाते चांगले ठेवावे. मुलांचे मित्र व्हावे. जेवण करतेवेळी टीव्ही बंद करा आणि आपल्या मुला-मुलींचे विश्व समजून घ्या. मुलांनीही आई वडिलांना अभिमान वाटेल अशीच कामगिरी करावी, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक नितीन झाल्टे म्हणाले की, विद्यार्थी हा महत्वाचा घटक असून त्यांचे गुण समजून घेणे हे महत्वाचे आहे. गुण ग्राहकतेने विद्यार्थ्यांचा गौरव केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक पंकज बोदडे यांनी केले. गुणवंत विद्यार्थी यादीचे वाचन तेजस्विनी तायडे मॅडम यांनी केले तर आभार रंजना बोदडे यांनी मानले. तसेच सूत्रसंचालन दिपाली लहासे मॅडम यांनी केले.
या समारंभास संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर, उत्तम मोरे, योगेश भालेराव, संतोष साळवे, दीपक हिवरे, ईश्वर सुरवाडे, प्रदीप तायडे, विक्रम तायडे, कविता बैसाणे इत्यादीसह सर्व शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.