सरासरी वीज बिले बंद करा- विधानसभाध्यक्षांची सूचना

 

मुंबई प्रतिनिधी । विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिलांवरून सरकारला घेरल्यानंतर विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी ही पध्दत बंद करण्याचे निर्देश दिलेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने राज्यातील जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे. ज्यांनी विज बिल वापरली त्यांनी विजेची बिलं भरावी याच दुमत नाही, पण ज्यांनी वापरलीच नाही, जी वीज वापरलीच नाही त्यांचं बिल का द्यायचं? असा सवालही फडणवीस यांनी विचारला. तसेच, सरकारमधील विसंवादावर बोलताना, तुम्हाला ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा मिटवा, असे फडणवीस यांनी म्हटले. दरम्यानच्या चर्चेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अ‍ॅव्हरेज लाईट बिल बंद करा, अशा सूचना सरकारला केल्या आहेत.

या चर्चेदरम्यान, नाना पटोले यांनी आपलं मत आणि सूचना राज्य सरकारला केल्या. महाराष्ट्रात अ‍ॅव्हरेज बिल देण्याची जी पद्धत आहे, ती तातडीने थांबवली पाहिजे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. कुठंतरी एखाद्याचं घर नाही, मिटर नाही त्यांनाही बिलं पाठवली जातात, हे अ‍ॅव्हरेज बिलामुळेच होतंय. त्यामुळे हे थांबवलं पाहिजे, अन्यथा सातत्याने हा विषय सभागृहात येईल,असे पटोले यांनी म्हटलं. तसेच, यापूर्वीच्या सरकारपासूनही तेच सुरू आहे, आणि आत्ताच्या सरकारमध्येही तेच. त्यामुळे हा राजकारणाचा विषय नसून अ‍ॅव्हरेज बिलं देणं सरकारणं थांबवलं पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Protected Content