सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून राष्ट्रीय एकता दौड रॅलीचे आयोजन सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता काढण्यात आली.

 

महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यालया उजाळा देत अखंड भारतासाठी पटेल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून राष्ट्रीय एकता दौड रॅलीला  सुरूवात करण्यात आली.

राष्ट्रीय एकता दौड रॅलीत महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक एस.राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त अविनाश बाविस्कर, क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, यांच्यासह महापालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व खेडाळू मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय एकता दौड ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून सुरूवात करण्यात आली. त्यानंतर कोर्ट चौक, बेंडाळे महिला महाविद्यालय, नवीन बसस्थानक पर्यंत काढण्यात येवून तिथेच समारोप करण्यात आला.

Protected Content