जळगाव : प्रतिनिधी । अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे प्रतिमापूजन व माल्यार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सरदार पटेल यांचे प्रतिमा पुजन , माल्यार्पण करण्यात आले . माजी महापौर तथा बहिणाबाई बिग्रेड च्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती आशाताई कोल्हे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले .
जळगावचे शहराचे पोलीस पाटील प्रभाकर पाटील , प्रगतिशील शेतकरी विलास चौधरी , अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडु) भोळे, परेश कोल्हे , बहिणाई ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष सुनिता नारखेडे, महानगराध्यक्षा हर्षा बोरोले, नगरसेविका सौ. मिनाक्षी पाटील , निलिमा पाटील खडके, माजी पंचायत समिती सभापती विजय नारखेडे , हॉटेल गौरवचे संचालक पिंटूशेठ पाटील , नगरसेवक प्रवीण कोल्हे , माजी नगरसेवक प्रदीप रोटे अजय बढे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , महानगराध्यक्ष अतुल महाजन ,रूपेश कोल्हे गोपाळ खडके , ललित चौधरी , निखिल रडे ,संदीप चौधरी, योगेश इंगळे, हर्षल आटाळे , सुरेश फालक, कार्तिक तळेले, अनिल पाटील, पप्पू चौधरी, बंटी भोळे, भूषण भोळे ललित चौधरी , चैतन्य कोल्हे , राहुल चौधरी , यांनी केले .
प्रशांत बाणाईत श्रीकांत मोरे , किरण कानडे , भैय्या पाटील , किरण ठाकूर , विक्की पाटील , शंकर कोळी यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
भाग-१
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1775616365922528/
भाग-२
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2713648608889021/