सरकारने शेतकर्‍यांची चेष्टा चालवलीय : गिरीश महाजन ( व्हिडीओ )

girish mahajan

जळगाव प्रतिनिधी । शेतकर्‍यांच्या हिताच्या बाता करणार्‍या राज्य सरकारने शेतकर्‍यांची चेष्टा चालवली असून याबाबत पावले न उचलल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिला.

आ. गिरीश महाजन म्हणाले की, सरकारने हेक्टरी २५ हजार रूपये देऊ अशी घोषणा केली होती. यानंतर कर्जमाफी जाहीर करण्यात आली. तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळाली नाही. आज खूप गरज असतांनाही शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही. यातच विजेचा प्रश्‍नदेखील खूप गंभीर बनला आहे. आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात असे झाले नव्हते. तर विद्यमान सरकारने शेतकर्‍यांची चेष्टा चालवली असल्याचा आरोप आ. महाजन यांनी केला. याचे निराकरण करण्यासाठी शेतकर्‍यांनी पावले उचलली नाही तर भाजततर्फे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारादेखील आ. गिरीश महाजन यांनी याप्रसंगी दिला.

पहा : आ. गिरीश महाजन यांचे म्हणणे….

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/209397310100258

Protected Content