सरकारकडून पुरेशी लस मिळाली तर मुंबईत सोसायट्यांमध्येही लसीकरण – महापौर

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  सरकारकडून पुरेशी लस मिळाली तर मुंबईत सोसायट्यांमध्येही  लसीकरण करण्याची महापालिकेची तयारी असल्याचे आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले

 

मुंबईतील लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबांची काळजी घेतली, तर आपण दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसरी लाट थोपवू शकू,” असा विश्वास महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला.

 

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली.  आता सर्वात मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण सुरू करत आहोत. सर्वसामान्य मुंबईकरांचं लसीकरण महापालिका करणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवस वॉक इन लसीकरण केलं जात आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबद्दल बोललं जात होतं. पण, आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो आहे की, ज्याप्रमाणे आरोग्य शिबिरं घेतली जातात, त्याचप्रमाणे पाच किमी अंतरातील सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिरं झाली पाहिजे. सरकारकडून लस मिळाली, तर महापालिका अशा स्वरूपातही लसीकरण करेल. रिक्षाचालक आणि फेरीवाले यांचं लसीकरण करण्याला प्राध्यान देण्याचा विचार केला जात आहे,” असं महापौर म्हणाल्या.

 

प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डमध्ये एक केंद्र असावं म्हणून दोन केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत. नगरसेवकांच्या केंद्रामध्ये लसी द्यायला हरकत नाही. ज्या सोसायट्यांना सोसायटीमध्येच लसीकरण शिबिरं आयोजित करायची आहे. त्यांनी महापालिकेकडे संबंधित माहिती द्यायला हवी. आता तज्ज्ञ सांगत आहे की, तिसरी लाट आली, तर ती सगळ्यांसाठी भयंकर असेल. आता त्या विषाणूचं स्वरूप बदलत आहे ,” असं महापौर म्हणाल्या.

 

“महापालिकेनं प्रत्येक वार्डमध्ये दोन भरारी पथकं नेमली आहेत. कुठेही लसीकरण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे भेट देणं. दिल्या जाणाऱ्या लशीची एक कुपी (वाईल्स) ताब्यात घेणं. लसीकरण कोण करत करतंय आदी माहिती  महापालिकेच्या प्रत्येक वार्डकडे असली पाहिजेत. सीरम इन्स्टिट्यूटला पत्र दिलं आहे. हिरानंदानी सोसायटीत देण्यात आलेल्या लशींची एक कुपी सीरमकडे पाठवण्यात आली असून, ती लसच आहे का? याची खात्री करून घेतली जात आहे. आता पोलीस आणि महापालिका चौकशी करत आहे. कांदिवलीनंतर लोक दक्ष झाले आहेत. जी लस दिली जात आहे, त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली आहे की, नाही. याबद्दल नागरिकांनी चौकशी करावी,” असं आवाहन महापौरांनी केलं.

 

मुंबईत पाचशे ते सहाशेच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या आणखी कमी व्हायला हवी. धारावीत शून्य रुग्णवाढ आहे. मुंबईत लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.    रुग्णसंख्या कमी झाली की विचार करू. सामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्याचा विचार करावाच लागेल, पण इतरांच्या जीवांवर बेतेल अशा पद्धतीने ना महापालिका वागणार ना राज्य सरकार,” असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

Protected Content