जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील असलेल्या सम्राट कॉलनी, मिनाबाई हायस्कूल लाठी शाळा, सिंधी कॉलनी परिसरसह इतर ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि शिवसेना शिंदे गटाची महानगरप्रमुख कुंदन काळे यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकास कामे होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या अनुषंगाने शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी अहवाल सादर केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निधी मंजूर करण्यात आला. निधी मंजूर केल्यानंतर सोमवारी २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रत्यक्षात कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या निधीतून सलार नगर, नीनाबाई हायस्कूल, लाठी शाळा, सिंधी कॉलनी, ईश्वर कॉलनी, रिलायन्स पेट्रोल, पंप पंचमुखी हनुमान मंदिर परिसर , कासमवाडी, मासूमवाडी, सम्राट कॉलनी, वर्षा कॉलनी, रचना कॉलनी, देविदास कॉलनी आणि एकता कॉलनी या परिसरात रस्त्यांसह गटारी आदी विकास कामे करण्यात येणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरसेविका रेश्मा कुंदन काळे, शिंदे गटाचे महानगर प्रमुख कुंदन काळे यांच्यासह परिसरातील नागरिक, शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.