समीर वानखेडेंच्या मेहुणीचा ड्रग्जचा व्यवसाय : नवाब मलीक

मुंबई प्रतिनिधी | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर यांचा ड्रग्जचा व्यवसाय असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून समीर वानखेडे यांना लक्ष्य करणारे नवाब मलीक यांनी आज पुन्हा नवीन आरोप केले आहेत. आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

यासंदर्भात नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा असल्याचे मलीक यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Protected Content