बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भोई समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून समाजाची बदनामी करणारे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत बोदवड तालुक्यातील भोई समाजाच्या वतीने तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोदवड नगरपंचायत निवडणूक येथून सुरू झालेल्या वादापासून ते बनाव गाडी हल्ला प्रकरणपर्यंत तसेच भोई समाजाचे तालुकाध्यक्ष छोटू भोई यांच्यासह मतदार संघातील बऱ्याच कार्यकर्त्यांवर देखील अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरून खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. तसेच विधान परिषदेत वाचलेल्या पाड्यांमुळे व खोटे गुन्हे असून देखील अधिकाऱ्यांवर वापरत असलेल्या दबावामुळे समाजाची राज्यात बदनामी झाली आहे. छोटू भाई हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख आहेत तसेच तळागाळातील जनसामान्य नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे मात्र एखाद्या सर्वसामान्य आणि वंचीत घटकातून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला केवळ राजकीय आकसातून खोटया गुन्ह्यात अडकवून त्याचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहे. छोटु भोई यांच्या विरुद्ध माजी मंत्री व विधान परिषद सदस्य आमदार एकनाथ खडसे यांनी चालविलेल्या षडयंत्राची दखल घेऊन पर्यायाने भोई समाजाची बदनामी थांबवावी, अन्यथा भोई समजाला देखील आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. तसेच सदरील प्रकारणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी असेही निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी सचिन भोई, पंकज भोई, योगेश भोई, उज्वल भोई, नितीन भोई, संजय भोई, महेंद्र भोई, महेश भोई, मुकेश भोई, संदीप भोई, समाधान भोई, नितीन चव्हाण, गणेश भोई, अर्जुन भोई, जितेंद्र भोई, अमोल भोई, निलेश भोई, पंकज भोई, विजय भोई यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.