समस्त बारी पंच मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर

जळगाव, प्रतिनिधी | समस्त बारी पंच जळगाव यांची बारी समाज हितवर्धिनी हॉलमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी  विजय बारी तर  उपाध्यक्षपदी  अरुण बारी यांची निवड करण्यात आली.

 

समस्त बारी पंच मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रस्तावना मंडळाचे सहसचिव मयुर बारी यांनी मांडली. तर सभेचे मागील वर्षाचे अहवाल वाचन मंडळाचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी केले. सभेत मागील आर्थिक वर्षातील कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील वर्षात आगामी कार्यक्रमाची रूपरेषा सर्वानुमते ठरविण्यात आली. सभेत सन २०२२-२३ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष- विजय बारी, उपाध्यक्ष अरुण बारी, सचिव हर्षल बारी , उपसचिव महेंद्र बारी, खजिनदार बालमुकुंद बारी, सहखजिनदार लतीश बारी, प्रसिद्धीप्रमुख नितीन बारी,  सहप्रसिद्धीप्रमुख मयूर बारी तर सदस्यपदी  सुनील बारी , विजय बारी , राहुल बारी , राजेंद्र बारी यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी कार्यकारणी विस्तार कामी समाज बांधवांना सदस्य नोंदणीचे आवाहन समस्त बारी पंच मंडळ जळगाव यांनी केले आहे. तरी इच्छुक समाजबांधवांनी मंडळाशी संपर्क साधावा सभेचे आभार मंडळाचे नवनिर्वाचित सहसचिव महेंद्र बारी यांनी केले. सदरप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समस्त बारी पंच कार्यकारीणी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content