सभापती रविंद्र पाटील यांना प्रकाश सरदार यांचा जाहीर पाठींबा

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषद शिक्षण क्रीडा व आरोग्य समिती सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांना प्रकाश यशवंत सरदार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याचे पत्र त्यांनी सभापती पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

 

शिवाजीनगर निंभोरा बु पो.फेकरी येथील रहिवासी व अ. क्र. ५चे उमेदवार प्रकाश यशवंत सरदार यांनी जिल्हा बँकेसाठी इतर संस्था व वैयक्तिक प्रवर्गात उमेदवारी करत आहेत. त्यांना या निवडणुकीतून माघार घ्यावयाची होती. परंतु, माघारीची वेळ निघून गेल्याने निवडणूक अधिकारी यांनी त्यांची माघारी स्वीकृत केली नाही. त्यामुळे ते निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी निवडणूक न लढविता आपला पाठींबा जिल्हा परिषद शिक्षण क्रीडा व आरोग्य समिती सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांना जाहीर केला आहे. मतदारांनी रवींद्र पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन प्रकाश सरदार यांनी केले आहे. त्यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र जिल्हा परिषद शिक्षण क्रीडा व आरोग्य समिती सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांना सुपूर्द केले. यावेळी कॉंग्रेसचे डी. जी. पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content