सभापतींकडून आ. चौधरींना डावलण्याचा प्रयत्न : शेखर पाटील यांचा आरोप (व्हिडिओ)

यावल अय्युब पटेल | यावल पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा दि. २३ रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याची तारीख बदलून २४ ऑक्टोबर करण्यात आली आहे, पंचायत समितीचे कॉंग्रेसचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी यावर आक्षेप घेत नोंदवत आ. शिरीष चौधरी यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलतांना केला आहे.

 

गट नेते शेखर पाटील यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यासाठी २००९ ते २०१४ च्या कालावधीत तत्कालीन व सध्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला होता. परंतु, २०१४ मध्ये शिरीष चौधरी यांचा पराभव करत स्व. हरिभाऊ जावळे हे निवडून आले होते. याकाळात आ. जावळे यांनी नवीन इमारतीचे भूमिपूजन करून निधी संदर्भात पाठपुरावा केला. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत शिरीष चौधरी हे पुन्हा निवडून आलेत. त्यांच्या संकल्पनेतील इमारत पूर्णत्वास येत असतांना या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी त्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची तारीख घेवून सभापती व त्यांच्या टीमने आ. शिरीष चौधरी यांची भेट घेत २३ तारखेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. मात्र, यानंतर तारखेत बदल करत २४ रोजी उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले. आ. चौधरी यांच्या माध्यमातून काम झालेले असतांना शासन त्यांचे असतांना त्यांना डावलण्यात येत आहे. या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ग्रामविकास खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना बोलविण्याबाबत आ. शिरीष चौधरी पत्रव्यवहार करत असतांना मंत्री महोदयांची तारीख येण्यापूर्वीच सभापती यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेण्याचे कारस्थान करण्याचा हा मोठा डाव हे खेळत आहेत. पालकमंत्री ना. पाटील यांनी देखील हा डाव ओळखावा. ज्या विभागाचा कार्यक्रम आहे त्या विभागाच्या मंत्र्यांकडे तारीख मागितलेली आहे. ती आल्यावर हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तरी आ. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री ना.हसन मुश्रीफ, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. लता सोनवणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जर यांना २४ तारखेची एवढीच घाई त्यांनी हा त्यांच्या पद्धतीने उरकून घ्यावा असे आवाहन शेखर पाटील यांनी केले आहे. हा शासकीय कार्यक्रम असून कुठल्याही पक्षाचा नाही. यास गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित यंत्रणा देखील यास कारणीभूत आहे. यातून ग्रामविकास खाते व आ. शिरीष चौधरी यांचा अपमान होत असल्याची भावना शेखर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1509446916087926

 

Protected Content