जळगाव, प्रतिनिधी । सन योगा ग्रुप व जळगाव रोटरी राॅयलतर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रायसोनी फार्म हाऊसच्या हिरवळीवर योगासन व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शिबिरार्थींनी विविध प्रकारच्या योगासन, प्राणायामचे प्रात्यक्षिक करुन त्यांना निरोगी, सकारात्मक विचार, आनंदी, समाधानी जीवनाचा मंत्र मिळाला.
या शिबिरात योगशिक्षक सुनील मधुकर गुरव यांनी योगासन व प्राणायामाच्या विविध लाभदायी प्रकारांची माहिती दिली. शिबिरार्थींच्या शंकाचे निरसनही करण्यात आले. योगाचे सहशिक्षक किरण दहाड आणि नंदलाल जाधवाणी यांनी अनुभव कथन केले. या शिबिरात सुखी, प्रसन्नमय आयुष्य व जीवनात यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली मिळाल्याचे मत स्नेहा ज्ञानचंदाणी यांनी व्यक्त केले. योगा, प्राणायामामुळे जीवन समृद्ध होत असून वैचारिक प्रगल्भता वाढतेय, असे पवन पाहुजा, जयश्री पाटील, यांनी सांगितले. योग शिक्षक अर्चना गुरव , नेहा तळेले व सुभाष तळले, यांनी शिबिरार्थींकडून प्रात्यक्षिक करुन घेतले.योगा क्लासच्या शेवटी सुनील गुरव सरांनी ३/४ प्रकारचे हास्यप्रयोग शिकविले सर्वांनी मनसोक्त हास्य केले व वातावरण चैतन्यमय झाले. योगशिक्षक सुनील गुरव व सहशिक्षकांचा सत्कार रोटरी जळगाव रॉयल्सचे अध्यक्ष स्वप्निल जाखेटे, मानद सचिव सचिन जेठवाणी,सन योगा गृपचे जेष्ठ योगसाधक कन्हैयालाल जाधवाणी, जनसंपर्क प्रमुख विजय लाठी, गोविंद वर्मा, जितेंद्र भोजवाणी आदींनी केला. दीपककुमार पाटील यांनी आभार मानले. या शिबिरात शरद जोशी, गिरीश शिंदे, प्रशांत पारसवाणी, पिंकी मंधाण, सुधा काबरा, प्रीती चोरडिया, ओमप्रकाश सचदेव, गोल मंडोर,पारसमल जैन, कन्हैयालाल जाधवाणी, रवी नाथाणी, अनिल मुंदडा, रमेश मताणी आदींनी सहभाग घेतला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/156907653144124