सत्यशोधक समाज संघाच्या अधिवेशानाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा दुसरे अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन खिरोदा येथे आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

भुसावळ तालुक्यातील पानाचे कुऱ्हे येथे सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे पूर्वनियोजित उद्घाटक आ. शिरीष चौधरी यांना त्यांच्या  खिरोदा निवासस्थानी शुक्रवार दि.२ डिसेंबर २०२२ रोजी जाऊन अधिवेशनाचे आमंत्रण देण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे व सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्य सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांनी शिरीष दादांना  प्रत्यक्ष भेटून सन्मानपूर्वक आमंत्रित करून आमदारांच्या हस्ते पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मुकुंद सपकाळे यांनी प्रास्ताविक केले.  तसेच राज्य सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांनी संघाची उदिष्ट्ये, ध्येयधोरणे व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कृती कार्यक्रम अन्वये सांगोपांग चर्चा केली.  मार्गदर्शन करतांना अधिवेशनाचे नियोजित उद्घाटक मा. आ.शिरीष चौधरी यांनी सांगोपांग चर्चा केली.  याप्रसंगी जिल्हा आयोजन समिती सदस्य विजय लुल्हे, संजय वराडे,निवृत्त केंद्रप्रमुख रमेश सोनवणे,उद्योजक सुरेश सपकाळे तसेच कुऱ्हे पानाचे अधिवेशन कार्यकारी समिती उपसरपंच विलास रंदाळे ( उपसरपंच ), ग्रा पंचायत सदस्य किशोर पाटील मान्यवर उपस्थित होते.आभार प्रमोद उंबरकर यांनी मानले.

Protected Content