फैजपूर, प्रतिनिधी । वडोदा, प्र सावदा व परिसरातील गरीब कुटुंबातील लहान मुलामुलींना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटर चे वाटप करण्यात आले.
वडोदा येथील निष्कलंकी धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर याठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या शुभहस्ते वय वर्ष दोन ते बारा वयोगटातील मुला-मुलींना उच्चप्रतीचे स्वेटर वाटप करण्यात आले. यावर्षी थंडी चा जोर जास्त असल्याने गरीब कुटुंबातील मुलांना स्वेटर वाटण्याचा संस्थेने निर्णय घेतला होता. याप्रसंगी घाटकोपर मुंबई येथील देवजी भाई पटेल व रमेश भाई पटेल, बामणोदचे प्रभाकर झोपे, अशोक नारखेडे (मुखी) उपस्थित होते. यावेळी बालगोपाल व त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.