मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील अवैध व्यवसायाची बातमी लाऊन ते धंदे बंद केल्यामुळे तिळपापड झालेल्या सट्टेवाल्यांनी तीन पत्रकारांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, प्रसारमाध्यमांमध्ये अवैध धंद्यांचा संदर्भात बातम्या लागल्याने अवैध धंद्यांना संदर्भात आवाज उठवल्याने त्याचा राग येऊन त्यांचा सूड घेण्यासाठी व यापुढे आपल्या विरोधात बोलू किंवा आवाज उचलू नये या हेतूने वृत्तसंकलन करून परतत असलेल्या मुक्ताईनगरातील पत्रकारांवर अवैध धंद्यांवाल्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून पत्रकारांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन दिवस आधी मुक्ताईनगर शहरातील पत्रकारानी प्रवर्तन चौकात चालणार्या अवैध धंदे म्हणजे सट्टा मटक्याचे केंद्र असलेल्या सट्टा माफिया विरोधात बातम्या लावल्या होत्या यानंतर मुक्ताईनगर पोलिसांकडून सट्टा माफियांची धरपकड करण्यात आली होती. त्याचा राग आल्याने चवताळलेल्या सट्टेवाल्यांनी पत्रकारांना मध्यस्थाच्या माध्यमातून यापुढे बातम्या लावल्यास तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली होती.
यानंतर काल रात्री सट्टा माफियांकडून अवैध धंदे चालकांकडून पत्रकारांच्या मोटरसायकलवर दगडफेक करण्यात येऊन गाडीचे नुकसान करण्यात आले. पत्रकार बातमीचे वृत्तसंकलन घेण्यासाठी गेले असता हॉटेल यादगार जवळ अंधाराचा फायदा घेत दोन युवकांनी मोटरसायकलवर येऊन साहसिक न्युजचे पत्रकार पंकज तायडे यांच्या मोटरसायकलीच्या समोरील काच, इंडिकेटर तोडून नुकसान केले. तसेच लाईव्ह ट्रेंड्स न्युजचे पत्रकार पंकज कपले यांच्या पायावर काठीने मारहाण व मंडे टू मंडे वृत्तपत्राचे प्रतिनिधी अक्षय काठोके यांना हातांवर मार लागला आहे, याबाबतची फिर्याद पत्रकार पंकज कपले आणि अक्षय काठोके यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे दिली असून अज्ञांता विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात कलम ३२३, ४२७ प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांवर होत असलेल्या हाल होत असेल तर अवैध धंद्या वाल्याना कायद्याचा धाक उरलेला नसून यांच्यावर महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७ चे पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात यावी. यासंदर्भात जिल्ह्यातील पत्रकार ठिकठिकाणी निवेदन देत निषेध करणार आहे. याघटनेचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक शंकर शेळके करीत आहे. परंतु अशा घटनांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना वृत्तसंकलन करणे कठीण होऊन जाईल त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे असा सूर जनमानसात उमटत आहे.