घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश; दोन जणांना अटक

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तळेगाव तांडा येथील साडेपाच लाखांचा घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव तांडा येथील रहिवासी संतोष सुधाकर राठोड (वय-२३) हे आपल्या कुटुंबियांसह दि.१२ जानेवारी २०२२ नातेवाईकांकडे लग्नाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

याप्रकरणी २४ जानेवारी रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अशोक चुनीलाल चव्हाण (वय-३२) आणि संदीप उर्फ सॅन्डी भीमसिंग चव्हाण (वय-२८) दोन्ही रा. कृष्ण नगर, तांडा तळेगाव ता.चाळीसगाव यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालापैकी ४ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान दोन्ही आरोपींकडून घरफोडीतील चोरीस गेलेल्या रकमे पैकी ४ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मुळ फिर्यादी संतोष राठोड यांना परत करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ युवराज नाईक, नितीन अमोदेकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांनी कारवाई करून दोन्ही संशयित आरोपींना अटक केली.

Protected Content