Home आरोग्य कोरानाचा संसर्ग पुन्हा वाढला : जिल्ह्यात आज १६९ कोरोना बाधित आढळले

कोरानाचा संसर्ग पुन्हा वाढला : जिल्ह्यात आज १६९ कोरोना बाधित आढळले


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोराना अहवालात‍ जिल्ह्यात रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर ५५ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. जळगाव शहरासह चाळीसगाव तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ८४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१२, अमळनेर-५, चोपडा-४, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-६, रावेर- ३, पारोळा-७, चाळीसगाव-२३, मुक्ताईनगर-१०, बोदवड-०  आणि इतरजिलह्यातील ३ असे एकुण १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाकडून आलेल्या अहवालात जिल्ह्यात ५८ हजाराचा टप्पा पार केला आहे. एकुण बाधितांची ५८ हजार २१ रूग्ण संख्या पोहचली आहे. त्यापैकी ५५ हजार ९८५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६६७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज सुदैवाने एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound