संसर्गाचा वाढता वेग , नवा स्ट्रेन लक्षात घेऊन उपचार पद्धत बदला — राजेश टोपे

 

 

औरंगाबाद : वृत्तसंस्था । राज्यात वर्षभरात कोरोना रुग्णांवर ठाराविक पद्धतीने उपचार सुरु आहे. मात्र आता संसर्गाचा धोका व  रुग्णांमध्ये नवा स्ट्रेनही आढळून येत आहे. अशावेळी उपचाराची पद्धत नव्याने ठरवण्याची गरज असल्याचा मुद्दा आरोग्यमंत्री राजेश  टोपे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता  उपचाराची पद्धत बदलली जाण्याची शक्यता आहे

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून  महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता  आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता कमीच आहे. पण कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक पार पडली. या बैठकीत राजेश टोपे यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले

 

राज्य सरकार सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर देत आहे. अशावेळी कोरोनाची कुठलिही लक्षणं आढळल्यास  चाचणी करुन घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं.  रुग्णांच्या संपर्कातील लोकांनीही चाचणी करुन घेण्याच्या सूचना केल्या जातात. पण राज्यात अनेक ठिकाणी  चाचणीसाठी गरीबांची  लूट सुरु आहे. गरीबांची लूट थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची विनंतीही राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

नागरिकांनी गर्दी टाळली आणि नियमांचं पालन केलं तर कोरोना रुग्णांची संख्या आपोआप कमी होईल. तेव्हा लॉकडाऊनची गरज तूर्तास तरी लागणार नाही. पण लोक स्वयंशिस्त पाळत नाहीत. त्यामुळे निर्बंध कडक करावे लागत आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो. जेव्हा सरकारच्या हातातील सर्व आयुधं संपतील. बेड्स उपलब्ध नसतील, अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय उरत नाही. पण सध्या नागरिकांनी शिस्त पाळावी, गर्दी करु नये, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय.

 

 

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी बंद ठेवायचे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाने चालत होते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर अहवाल आणून निर्णय घेण्याचं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पुण्यात जो निर्णय झाला तो वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन निर्णय घेतला. देशातील टॉप आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, असंही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

Protected Content