जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संविधान नगर वाघनगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन तसेच सम्राट अशोका विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रभाकर बिऱ्हाडे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर उपासक योगेश भालेराव यांनी सामूहिक त्रिसरण पंचशील घेतले व धम्म चक्र प्रवर्तन म्हणजे काय त्या विषयी संबंधित विविध घटनांबद्दल मार्गदर्शन केले. चंद्रभागा सपकाळे यांनी यावेळी सुंदर अशी भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली व सर्वांना बुद्ध भीम विचारांची प्रेरणा दिली. सम्राट सुरडकर या चिमुकल्याने छान असे भाषण यावेळी केले.
कार्यक्रमाचे आयोजन रमाई महिला मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रापाल सुरडकर यांनी केले तर प्रसंगी सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते.