मुंबई प्रतिनिधी | एकीकडे देशाची राज्यघटना पायदळी तुडवली जात असतांना केंद्र सरकार संविधान दिवस पाळण्याचे नाटक का करत आहे ? असा सवाल आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आज देशभरात संविधान दिन साजरा होत असून यानिमित्ताने केंद्र सरकारने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, मोदी सरकारचा निषेध करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यामध्ये शिवसेनेचाही समावेश होता. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, एकीकडे देशाची घटना पायदळी तुडवली जात असताना दुसरीकडे संविधान दिन साजरे करण्याचे नाटक कशासाठी केले जात आहे, अशी विचारणा केली.
विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. देशात दररोज संविधान पायदळी तुडवले जात आहे. देशात संविधानाचे राज्य राहिलेले नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमे, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचे