पारोळा प्रतिनिधी । येथील सम्यक सुनील जाधव या विद्यार्थ्याने भारताचे संविधान तोंडी पाठ म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन केले आहे.
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही. याचा प्रत्यय १४ एप्रिल रोजी पारोळ्यात आला. बोहरा सेंटर स्कूलचा विद्यार्थी सम्यक सुनील जाधव यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी केली. या वेळी भारतीय संविधान चक्क तोंड पाठ म्हणून कुटुंबियाना सुखद धक्का दिला. प्रज्ञा सूर्य महामानव ,भारतीय संविधानचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देश आणि विदेशात साजरी करण्यात आली. कोरोनाचे संकट व लॉकडाऊन असल्याने प्रत्येकाने नियमाचे पालन करुन जयंती घरीच साजरी केली. बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना दहा वर्षे वय असणार्या सम्यक सुनील जाधव याने भारतीय संविधान तोंड पाठ सादर केले. तो मंगरूळ येथील मुळ रहिवासी व हल्ली मुक्काम स्वामी नारायणनगर पारोळा येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील भिवा जाधव यांचा मुलगा आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००