मुंबई प्रतिनिधी । बेस्ट कर्मचार्यांनी संप मागे घेऊन वाटाघाटी कराव्यात असे निर्देश आज उच्च न्यायालयाने दिल्यामुळे सात दिवसांपासून सुरू असणारा संप मिटण्याचे संकेत मिळाले आहेत.
गत सात दिवसांपासून बेस्ट कर्मचार्यांचा संप सुरू असून यामुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत. संप मिटवण्यासाठी अनेकदा चर्चांच्या फेर्या झडल्या तरी कोणताही मार्ग न निघाल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमिवर, संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात कर्मचार्यांनी संप मागे घेऊन वाटाघाटी कराव्यात अशी भूमिका महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने घेतली. ही भूमिका मान्य करून उच्च न्यायालयाने संपकर्यांना संप मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, संपकरी कर्मचार्यांना न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. यामुळे बेस्ट कर्मचार्यांचा संप मागे घेण्याचे संकेत मिळाले आहेत.