संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट ; ऊर्जामंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणाच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

 

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलाबाबत ग्राहकांसाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. विविध आघाड्यांवर नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, संपूर्ण वीज बिल एकत्रित भरल्यास दोन टक्क्यांची सूट दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.

Protected Content