यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी तथा बाल कल्याण समितीचे जिल्हा सदस्य संदीप पाटील ( सोनवणे ) यांच्या व्याख्यानांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता मॉसाहेब जिजाऊ आणि तरुणांचे प्रेरणास्त्रोत यांच्या जयंती निमित्तान म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून करियर या विषयावर आज दिवसभरात डांभुर्णी तालुका यावल येथील रहीवासी व बाल कल्याण समितीचे जिल्हा सदस्य संदीप पाटील ( सोनवणे ) यांचे प्रमुख उपस्थित ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्यानाच्या कार्यक्रमांचे आयोजन पार पडले या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला .
संदीप पाटील यांनी सकाळच्या सत्रात भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे कामगार कल्याण मंडळ आणि शारदा माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरवर बोलू काही या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि दुपारच्या सत्रात चामुंडा माता फार्मासिटिकल कॉलेज तसेच मेडिकल कॉलेज येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी चर्चासत्र या स्वरूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधला..
दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना मुलांच्या हक्काबाबत तसेच बालकांवर आजूबाजूला होत असलेल्या अत्याचाराबाबत जागृत राहण्यास सांगितले तसेच कुणीही बेवारस किंवा विना पालक आढळल्या किंवा काळजी व संरक्षणाची गरज असेल असं बालक आढळलं तर १०९८ तसेच बालकल्याण समितीला संपर्क करा या संदर्भात आवर्जून माहिती संदीप निंबाजी पाटील ( सोनवणे ) यांनी दिली व या विषयी विद्यार्थी विद्यार्थीनींना आपल्या व्याख्यानातुन अचुक अशी माहीती देत मार्गदर्शन केले.