Home Cities जळगाव संत सेवालाल महाराज जयंती उत्सहात साजरी (व्हिडिओ)

संत सेवालाल महाराज जयंती उत्सहात साजरी (व्हिडिओ)

0
37

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चित्र चौकात संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने क्रांतिकारी श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

 

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्ताने चित्रा चौकात रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होत. याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याहस्ते करण्यात आले. तर समस्त बंजारा समाज बांधवांनी ढोल ताश्याच्या गाजरावर ठेका घेतला आहे. याप्रसंगी संत सेवालाल जयंती समितीचे नाशिक विभागीय अध्यक्ष ॲड. सागर राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुशील शिंदे, राजू सोनवणे, रवींद्र पवार, संत वसंतराव नाईक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबुस धाडी, गोरसेवक जिल्हा संयोजक मनोज जाधव, जिल्हा संघटक सेलचे सुमित अहिरे, गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम राठोड, सचिव बादल नाईक यांच्यासह संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/314550627377648

 


Protected Content

Play sound