Home Cities जळगाव संत सावतानगरात वृक्षारोपण करून विवाह सोहळा संपन्न (व्हिडिओ )

संत सावतानगरात वृक्षारोपण करून विवाह सोहळा संपन्न (व्हिडिओ )

0
51

जळगाव, प्रतिनिधी । येथील संत सावतानगरातील पंचवटी उद्यानांत चि. गणेश व व चि. सौ. जागृती यांचा विवाह यांच्याहस्ते वृक्षारोपण करून गुरुवार २५ जून रोजी संपन्न झाला.

चि. गणेश व चि. सौ. जागृती यांचा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने ,ढोल ताशे फटाके न वाजवता खुप गर्दी न करता ,पूर्णता पर्यावरण पुरक असा सोहळा .पार पडला. ही वृक्षारोपणाची संकल्पना अखिल भारतीय श्री स्वामीसमर्थ दिंडोरी प्रणित पर्यावरण प्रकृती विभाग जळगाव केंद्राच्या वतीने राबविण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र बडगुजर, राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील, विजय चौधरी, अजय माळी, अतिष सोनवणे, भोई दादा उपस्थित होते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र पर्यावरण प्रकृती विभाग जिल्हा प्रतिनिधी वसंत पाटील यांनी सहकार्य केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/618851202073416/


Protected Content

Play sound