जळगाव, प्रतिनिधी | अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट यांच्यातर्फे संत बाबा हरदासराम साहेब यांच्या ११७ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी बांधवातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संत बाबा हरदासराम यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. विविध धार्मिक विधी पार पाडत बाबांच्या भजनामध्ये भाविक लीन झाल्याचे दिसून आले. दरम्यान, यानिमित्ताने सामूहिक विवाह सोहोळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी बाबा हरदासराम साहेब यांची प्रतिमा घेऊन मोठ्या उत्सहात संपूर्ण सिंधी कॉलनी परिसरात मिरवणूक काढण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. आज विविध धार्मिक कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पार पडले. संत बाबा हरदासराम यांच्या जयंती उत्सवास प्रत्येक वर्षी देशभरातून सिंधी बांधव दर्शनासाठी येत असतात. मात्र, शासनाच्या कोरोना नियमपाळून यावर्षी मोजक्याच लोकांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला अशी माहिती रमेश मतानी व अशोक मंधान यांनी दिली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1754863224712768