Home Cities एरंडोल एकाने गळफास घेऊन तर दुसऱ्याने विष घेऊन केली आत्महत्या!

एकाने गळफास घेऊन तर दुसऱ्याने विष घेऊन केली आत्महत्या!

0
40

एरंडोल, प्रतिनिधी | येथे एकाने गळफास घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल येथील हनुमान नगरातील संतोष लक्ष्मण महाजन (वय- ४९) यांनी शेतातील नींबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कासोदा रस्त्यावरील शेत शिवारात रायसिंग रा. साहदर, तीतरवांगली ,ग्रा.पं.सिरवेल, खरगोन, मध्यप्रदेश याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. याबाबत पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता त्याच्या खिशात विषारी औषधांची बाटली मिळून आली. म्हणून सदर इसमाने विष घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दोघेही मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार सुरू आहेत.


Protected Content

Play sound