संत ज्ञानेश्वर विद्यालयात नैसर्गिक रंग बनविण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण येथीलश्री. श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात होळी सणानिमित्त नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध फुले, पानांपासून रंग बनविले. पर्यावरणपूरक होळी खेळण्याबाबत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही प्रकारचे रासायनिक रंग न वापरता फुलांपासून, पानांपासून यात झेंडू, शेवंती, गुलाब, पळस, कागदी फुले व पाने, कडुलिंबाची पाने, बीटचा सुकविलेला किस, हळद, बेसन, तांदळाचे पीठ, शेंदूर, कुंकू आदीचा वापर करून रंग कसे तयार करायचे,याचे प्रशिक्षण शिक्षकांकडून घेतले.

नैसर्गिक रंगांपासून कोणतेही डोळ्यांचे, केसांचे व त्वचेचे आजार होणार नाहीत. पाण्याची बचत तर होईलच पण आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य राहील. होळीचा दरवर्षीप्रमाणे आनंद घेता येईल व आपल्या पर्यावरणचा समतोल साधला जाईल, असे उपक्रम प्रमुख संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक सर यांनी सांगितले.

विद्यालयातील मुख्याध्यापिका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Protected Content